UAE मध्ये जाताय… जरा थांबा !!! व्हिसासाठीचे ‘हे’ नियम नवीन समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 दुबई । UAE मध्ये जाऊन राहण्याचे आणि काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. UAE ने आता देशात राहणासाठी आणि काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत 10 प्रकारचे एंट्री व्हिसा (UAE Entry Visa) जारी करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, या नवीन व्हिसा धोरणांतर्गत कोणत्याही होस्ट अथवा प्रयोजकाची गरज नसेल. याबरोबरच एंट्रीसाठी देखिल लिमिट नसेल.

याअंतर्गत व्हिझिटर म्हणून 60 दिवसांपर्यंत राहता येईल. जे याआधी 30 दिवस होते. आता या नवीन नियमन अंतर्गत गोल्डन व्हिसा धारक आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील स्पॉन्सर करू शकतील. तसेच आपल्या कामगारांना होस्ट करू शकतील.

छवि

व्हिसाचे नवीन नियम असे असतील
या नवीन नियमांप्रमाणे आता आई वडील आपल्या मुलाला 25 वयापर्यंत स्पॉन्सर करू शकतील. जे आधी 18 होते.
हे नियम जगभरातील टॅलेंटेड लोकांना आकर्षित करण्यासाठी बनवले गेले आहेत.
प्रोफेशनल कामगारांकडे व्हिसा साठी त्यांच्या कंपन्यांसोबतचा व्हॅलिड वर्किंग कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे.
शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर असावी आणि मंथली सॅलरी $8,100 पेक्षा कमी नसावे.
संस्कृती, कला, क्रीडा, डिजिटल टेक्नोलॉजी, संशोधन क्षेत्रातील लोकांनाही सहजपणे मिळणार व्हिसा
यासाठी नोकरी, सॅलरी किंवा कोणत्याही पात्रतेची गरज नाही. मात्र, सरकारी शिफारस आवश्यक असेल.

Leave a Comment