कोल्हापूरमध्ये २५ वर्षांनी सत्तापालट; गोकुळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र्र – आज गोकुळ दूध संघाच्या निवडुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सतेज पाटील गटाने बाजी मारली आहे. सतेज पाटील गटाला १७ जागा मिळाल्या आहेत तर धनंजय महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जवळजवळ २५ वर्षांनी कोल्हापुरात सत्तापालट पाहायला मिळाले आहे.

महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी २ मे रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. सत्ताधारी महाडिक गटाकडून शाहू पॅनल उभे केले होते तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभे केले होते.

विरोधी गटामधील सुजित मिनचेकर यांचा ३४६ मतांनी तर अमर पाटील यांचा ४३६ मतांनी विजय झाला आहे. हा सत्ताधारी गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

You might also like