हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात अनेक लोकांकडून सोने आणि दागिने खरेदी केले जातात. अलीकडच्या काळात डिजिटल गोल्डची क्रेझ खूपच वाढली आहे. त्यामुळे आता लोकं फक्त फिजिकल गोल्डबरोबरच तर डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक करत आहेत. चांगला रिटर्न मिळत असल्याने सोने हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील ठरत आहे.
अडीअडचणीच्या काळात सोने हा एक मोठा आधार ठरते. त्यामुळे लोकांकडून सहसा सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र गुंतवणुकीसाठी फिजिकल गोल्ड की डिजिटल गोल्ड यांपैकी कोणता पर्याय सर्वांत चांगला ठरेल हे आज आपण समजून घेउयात… Gold Investment
फिजिकल गोल्ड
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे नेहमी फायद्याचे ठरते. सण, लग्न किंवा इतर कोणत्याही समारंभात दागिने घालण्यासाठी साहजिकच फिजिकल गोल्डची खरेदी करावी लागेल. फिजिकल गोल्डमध्ये सोन्याचे ब्रिक-बिस्किट किंवा बनवलेले दागिने खरेदी करता येतील. मात्र त्यांची विक्री करताना खरेदीदाराकडून मेकिंग चार्जेस देण्यास नकार दिला जाऊ शकतो. त्यामुळे या गुंतवणुकीवर मिळणार रिटर्न थोडा कमी असू शकतो. Gold Investment
डिजिटल गोल्ड
फक्त गुंतवणुकीच्या उद्देशाने हा पर्याय सुरु केलेला आहे. यामध्ये सोन्याच्या ब्रिक किंवा बिस्किटे मिळत नाहीत. यामध्ये आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या रकमेनुसार आपल्याला किती डिजिटल गोल्ड मिळेल हे निश्चित केले जाते. याशिवाय ते हरवण्याची भीती देखील नाही. तसेच यामध्ये विक्रीच्या वेळी शुल्क आकारण्याच्या स्वरूपात पैसे कमी होण्याची शक्यताही नाही. यामुळेच आजकाल लोकांमध्ये डिजिटल गोल्डला जास्त पसंती दिली जात आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल सोने हे कधीही चांगलेच आहे. Gold Investment
डिजिटल गोल्ड कसे खरेदी करता येईल ???
डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF). याशिवाय गोल्ड लिंक्ड म्युच्युअल फंडामध्येही गुंतवणूक करून चांगली कमाई करता येईल. तसेच, आजकाल असे अनेक ऑनलाइन पोर्टल्स देखील आहेत ज्याद्वारे डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करता येईल. उदाहरणार्थ, कोणतीही बँक किंवा ज्वेलर्सच्या वेबसाइटवरून डिजिटल गोल्ड खरेदी करता येईल. Gold Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amfiindia.com/investor-corner/knowledge-center/gold-etf.html
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा