Gold Price : आज सोन्या-चांदीमध्ये किती वाढ झाली जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीची किंमत वाढू लागली आहे. आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत 0.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे.

सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या
ऑक्टोबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी कमी होऊन 49,093 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 66,409 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

www.goodreturns.in वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50850 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49360 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48370 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49370 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :a
मुंबई – 48360 रुपये
पुणे – 47520 रुपये
नागपूर – 48370 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49360 रुपये
पुणे – 50850 रुपये
नागपूर – 49370 रुपये

Leave a Comment