Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आज सोन्याचे दर कितीने वाढले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज, 10 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचे दरही वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी 0.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

देशात लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढत असून त्याचाच परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. सोने आणि चांदी दोन्ही वरच्या पातळीवर ट्रेड करताना दिसत आहेत.

सोन्याचा आजचा भाव
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे फेब्रुवारीचे फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी वाढून 48,008 रुपये प्रति ग्रॅमवर ​​दिसत आहेत. गेल्या वर्षी सोन्याने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता आणि यावेळी सोने ऐतिहासिक पातळीपासून 8000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीचा आजचा भाव
चांदीचा धातू किंवा चांदीच्या किमती आज 0.07 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि एमसीएक्सवर त्याचे मार्च फ्युचर्स 60,839 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,290 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,560 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,850 रुपये
पुणे – 46,290 रुपये
नागपूर – 46,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,850 रुपये
पुणे – 49,560 रुपये
नागपूर – 47,850 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

 

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4628.00 Rs 4628.00 0 %
8 GRAM Rs 37024 Rs 37024 0 %
10 GRAM Rs 46280 Rs 46280 0 %
100 GRAM Rs 462800 Rs 462800 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4955.00 Rs 4955.00 0 %
8 GRAM Rs 39640 Rs 39640 0 %
10 GRAM Rs 49550 Rs 49550 0 %
100 GRAM Rs 495500 Rs 495500 0 %

Leave a Comment