Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजची सोन्याची किंमत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 286 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव 48,959.00 रुपयांवर आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 759.00 रुपयांनी घसरला आहे. चांदी 65,727.00 वर ट्रेड करत आहे.

सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 262 रुपयांनी घसरून 44,837 रुपयांवर ट्रेड करताना दिसत आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,949 रुपये झाला. याशिवाय 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 48,753 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 36,712 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 28635 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 65,727 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,140 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,470 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,280 रुपये
पुणे – 47,140 रुपये
नागपूर – 48,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,280 रुपये
पुणे – 50,470 रुपये
नागपूर – 49,280 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4714.00 Rs 4715.00 0.021 %⌃
8 GRAM Rs 37712 Rs 37720 0.021 %⌃
10 GRAM Rs 47140 Rs 47150 0.021 %⌃
100 GRAM Rs 471400 Rs 471500 0.021 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5047.00 Rs 5048.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 40376 Rs 40384 0.02 %⌃
10 GRAM Rs 50470 Rs 50480 0.02 %⌃
100 GRAM Rs 504700 Rs 504800 0.02 %⌃

Leave a Comment