Gold Price Today: बापरे! सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक; खरेरीपूर्वी आजचे भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एप्रिल महिना सुरू झाला की लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे सराफ बाजारात ही सोन्या – चांदीचे (Gold Price Today) दागिने घडवण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते. मात्र अशा काळातच सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकाची पातळी गाठली आहे. आज सोन्याचे भाव 70 हजारांच्या घरात गेले आहेत. तर चांदीची चकाकी देखील वाढली आहे. ज्यामुळे आज सोने खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 69,380 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 69,380 रुपयांनी व्यवहार करत आहे. हे भाव वाचून आपल्या लक्षात येईल की, सध्याच्या घडीला सोने खरेदी करणे ग्राहकांना परवडण्याचा बाहेर गेले आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,600 रुपये
मुंबई – 63,600 रुपये
नागपूर – 63,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 69,380 रूपये
मुंबई – 69,380 रूपये
नागपूर – 69,380 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्याच्या नाही तर चांदीच्या भावांनी (Gold Price Today) देखील ग्राहकांना झटका दिला आहे. कारण सोमवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 786 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,860 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 78,600 रूपये अशी आहे. दरम्यान, पुढील काही काळ सोन्या-चांदीच्या भावात दररोज वाढ होत जाईल, असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.