Gold Price Today : लग्नसराईच्या काळात सोने महागले! तर चांदीचा भाव किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| लग्नसराईचा काळ सुरू झाला की सोने खरेदीसाठी लगबग सुरू होते. परंतु सध्या नेमक्या अशा काळातच सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर सोन्याचे भाव कमी होतील अशी आशा लावणाऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या भावांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. बुधवारी चांदीचे भाव कमी झाल्यामुळे सोन्याऐवजी चांदी खरेदीवर जास्त भर दिला जात आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार बुधवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,850 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,020 रूपयांनी सुरू आहे. तर MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,850 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,020 रुपयांनी व्यवहार करत आहे. परंतु यापूर्वी हेच सोन्याचे भाव 60 हजाराच्या घरात व्यवहार करत होते.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today) 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,850 रुपये
मुंबई – 56,850 रुपये
नागपूर – 56,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,020 रूपये
मुंबई – 62,020 रूपये
नागपूर – 62,020 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

आजचे आपण चांदीचे भाव (Gold Price Today) पाहिला गेलो तर त्यामध्ये किंचित घसरण झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदीचा भाव 76,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज  बऱ्याच काळानंतर चांदीचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, 24 कॅरेट सोने हे पूर्णपणे शुद्ध असते. या सोन्यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण करण्यात येत नाही. हे सोने अत्यंत मऊ आणि मुलायम असते. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी दर्शवते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून आपल्याला समजते की, विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे.