Gold Price Today| सणासुदीच्या काळामध्ये आणि लग्नसराईच्या वेळेत सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळते. परंतु सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे ग्राहकांचे सोने खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. त्याचबरोबर, चांदीच्या किमती देखील वाढल्यामुळे ग्राहकांचे मोठे निराशा झाली आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतींनी 62 हजारांचा आकडा पार केला आहे. तसेच, चांदी 7 हजारांच्या पुढे व्यवहार करताना दिसत आहे. त्यामुळे अशा काळात तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम आजचे सोन्या-चांदीचे भाव तपासा.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुड रिटर्न्स आणि MCX वेबसाईट सोन्या-चांदीचे अचूक भाव (Gold Price Today) सांगते. आपण या वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,020 रूपयांनी सुरू आहे. MCX वेबसाईटवर देखील सध्या सोन्याचे हेच भाव दाखवले जात आहेत. त्यामुळे हाताच्या घडीला ग्राहकांनासोने खरेदी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,850 रुपये
मुंबई – 56,850 रुपये
नागपूर – 56,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,020 रूपये
मुंबई – 62,020 रूपये
नागपूर – 62,020 रुपये
चांदीचे भाव
गुड रिटर्न्स आज चांदीच्या किमतीनी (Gold Price Today) देखील उचांकाची पातळी घातली आहे. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 762 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,620 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,200 अशी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चांदीचे हेच भाव उतरले होते. ज्यामुळे ग्राहक चांदीचे दागिने खरेदी करण्यावर जास्त भर देत होते. मात्र आता किमती वाढल्यामुळे व्यवहारात स्थिरता आली आहे.
दरम्यान, सराफ बाजारात सोने खरेदी करताना कधीही सोन्याची शुद्धता तपासून ते खरेदी करावे. कारण, सोने अशुद्ध असल्यास एका काळानंतर त्याला काळपट रंग चढू लागतो. तसेच, सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे देखील पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे कधीही सोन्याची शुद्धता तपासून आणि हॉलमार्क पाहून सोने खरेदी करावे.