Gold Price Today: सणासुदीच्या काळात सोन्या- चांदीच्या भावात मोठे बदल; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| होळी सणानिमित्त सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. सणासुदीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ असते म्हणून, ग्राहकांकडून विविध डाग दागिन्यांचे भाव विचारले जात आहेत. त्यामुळेच आम्ही सांगू इच्छितो की, सोन्या चांदीचे भाव आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कडाडले आहेत. सोमवारी सोन्याच्या भावाने (Gold Price Today) 66 हजारांचा आकडा पार केला आहे. तर चांदीचे भाव 77 हजारांच्या वर पोहोचले आहेत.

सोमवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,820 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,250 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,820 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याच्या किमती कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,250 रुपये
मुंबई – 61,250 रुपये
नागपूर – 61,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,820 रूपये
मुंबई – 66,820 रूपये
नागपूर – 66,820 रूपये

चांदीचे आजचे भाव

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीच्या भावांनी(Gold Price Today) देखील ग्राहकांचे टेन्शन वाढवले आहे. सोमवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 778 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,780 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,800 रूपये अशी आहे. सोन्या चांदीच्या या भागात आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे चढ-उतार होत असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.