Gold Price Today | आज ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या किमतींमध्ये रोज होणाऱ्या चढउतारानंतर आज (मंगळवारी) सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या दोन-चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या होत्या. त्यामुळे अशा काळात ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले होते. मात्र आता सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी जमली आहे. तर गणेशोत्सवाच्या निमित्त सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे.
मंगळवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,750 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,730 रुपयांनी व्यवहार करत आहे. MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रुपये असाच सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. आजचे MCX वेबसाईटवरील सोन्याचे भाव स्थिर आहेत.
(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,750 रुपये
मुंबई – 54,750 रुपये
नागपूर – 54,750 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 59,730 रूपये
मुंबई – 59,730 रूपये
नागपूर – 59,730 रुपये
चांदीचे आजचे भाव
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, सोन्यासोबत आज चांदीच्या किमती देखील उतरल्या आहेत. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 748 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,480 रुपये भावाने विकली जात आहे. तसेच, 1000 ग्रॅम चांदी 74,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजचा दिवस सोन्यासोबत चांदीची खरेदी करण्यासाठी देखील योग्य आहे.
प्लॅटिनमची किंमत
आजचे आपण प्लॅटिनमचे भाव पाहिला गेलो तर, प्लॅटिनमच्या किमती कमी झाल्या आहेत. सोमवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24, 190 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,41,900 रुपयांनी व्यवहार करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये रोज फरक पडत आहे. याचाच परिणाम स्थानिक पातळीवरील किमतींवर देखील होत आहे.