Gold Price Today: सोन्याच्या भावात तेजी मात्र चांदीची चकाकी उतरली; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगली कात्री बसू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक सोन्या-चांदीचे भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे हे भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आज पुन्हा एकदा सोन्या – चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.

Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,620 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,960 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचे सोने-चांदी खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे.

Gold Price Today
                                                                                                       Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,400 रुपये
मुंबई – 57,400 रुपये
नागपूर – 57,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,620 रूपये
मुंबई – 62,620 रूपये
नागपूर – 62,620 रुपये

Gold Price Today
                                                                                                    Gold Price Today

चांदीचे भाव

तर दुसरीकडे शनिवारी चांदीतील घसरण कायम आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 746 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,600 रुपयांनी सुरू आहे. यामुळेच आज चांदीच्या दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज बऱ्याच काळानंतर प्लॅटिनमच्या किमती घसरले आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,220 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,42,200 असा सुरू आहे. या कारणामुळे सध्या सराफ बाजारात सोन्यापेक्षा चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची जास्त मागणी केली जात आहे. (Gold Price Today)