हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (25 नोव्हेंबर रोजी) भारतीय (Gold Price Today) फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या- चांदीच्या किमतीत किंचित वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचर्स 49 रुपयांच्या वाढीसह 52,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहेत. त्याच वेळी, एमसीएक्स चांदीचा डिसेंबर फ्युचर्स 78 रुपयांनी वाढून 62,071 रुपये प्रति किलोवर आहे. तसेच आज जागतिक बाजारात सराफाच्या किमतीत संमिश्र कल दिसून येत आहे.
शुक्रवारी, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 49 रुपयांच्या वाढीसह 52,720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. याशिवाय मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. आज चांदीचा भाव 49 रुपयांनी वाढला असून तो 62,062 रुपयांवर व्यवहार करत आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत