नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमती खाली येत आहेत. शुक्रवारीही सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड घसरण झाली, सोन्याच्या भावात घसरण होण्याचा हा सलग सहावा दिवस आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा 0.2 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर गेला, जी गेल्या 8 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळी आहे. चांदीचा वायदा हा 1 टक्क्याने घसरून 68,479 रुपये प्रतिकिलोवर आला. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यानंतर सोन्याचे दर दहा हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
सोन्याचे नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर पोहोचला. जी 8 महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. गुरुवारी, एमसीएक्सवरील एप्रिलच्या वायद्याचे भाव 100 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 46126 रुपयांवर बंद झाले. जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 0.4 टक्क्यांनी घसरून 1,769.03 डॉलर झाली.
चांदीचे नवीन दर
शुक्रवारी चांदीच्या भावातही किंचित घट नोंदली गेली. सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलो 68,479 रुपयांवर आला. जागतिक बाजारात चांदी 1.1 टक्क्यांनी घसरून 26.71 डॉलर प्रति औंस झाली. इतर मौल्यवान धातूंपैकी प्लॅटिनम 2.4% घसरून 1,244.19 डॉलरवर, तर पॅलेडियम 0.7% वाढीसह 2,334.58 डॉलरवर गेला
तज्ञांचे मत
तज्ञांचा असा विश्वास आहे की, जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल तर ही योग्य वेळ असेल. सोन्याच्या किंमतीही प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपयांच्या खाली आल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव मे 2020 च्या पातळीवर आला आहे. एमसीएक्सवर चांदी 68500-68000 च्या पातळीपेक्षा वर राहील. तज्ञांच्या मते, चांदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, जी 70000 च्या पातळीवर जाऊ शकते.
यावर्षी गेल्या काही महिन्यांत सोन्याची किंमत 10 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.