नवी दिल्ली । बुधवारनंतरही भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली गेली. गुरुवारी, 18 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्ली बुलियन बाजारामध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची घट झाली आणि त्याउलट चांदीच्या किंमतीत आज प्रति किलो 28 रुपयांची किंचित वाढ नोंदली गेली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,187 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदी 68,255 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये (International Markets) आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदली गेली, मात्र चांदीचे दर तसेच राहिले.
सोन्याच्या नवीन किंमती
दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची घसरण झाली आहे. राजधानी दिल्ली येथे 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम 45,867 रुपये झाले आहेत. यापूर्वी, व्यापार सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 46,187 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,780 डॉलर झाली.
चांदीच्या नवीन किंमती
चांदीच्या किंमती गुरुवारी किंचित वाढ नोंदवल्या. दिल्ली बुलियन बाजारात आता त्याची किंमत अवघ्या 28 रुपयांनी वाढून 68,283 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही चांदीचा भाव 27.16 डॉलर प्रति औंस राहिला.
सोन्यात घसरण का झाली ?
तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये सतत वाढ होते आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारामध्ये स्पष्टपणे दिसून येतो. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती खाली येत आहेत. सध्याच्या स्तरावर सोन्याची खरेदी ही दीर्घ मुदतीमध्ये फायदेशीर सौदा असल्याचे सिद्ध होऊ शकते. एका अंदाजानुसार, यावर्षी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.