हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : या आठवड्यात सोन्याचे भाव नरमल्याचे दिसून येत आहेत. RBI ने रेपो रेटमध्ये केलेल्या वाढीनंतरही सोन्याच्या किंमती सपाट पातळीवर दिसत आहे. आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 57,200 च्या वर आहेत. आज सकाळी (8 फेब्रुवारी 2023 रोजी) MCX वर 10:05 च्या सुमारास सोन्याचा वायदा 56 रुपयांनी घसरून 57,201 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे चांदीचा फ्युचर्सही रेड मार्कमध्ये दिसून आला. यावेळी ते सुमारे 67,522 रुपये प्रतिकिलो इतके होते. मात्र, सराफा बाजारात त्याचे भाव वाढले होते.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,210 रूपयांवर तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,443 रूपयांवर आला आहे. तसेच चांदीच्या दरात आज 80 रूपयांची घसरण होऊन एक किलो चांदीचा दर 67,700 रूपयांवर आला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 0.3% कमी होऊन 1,585.78 डॉलर प्रति औंस वर तर चांदीची स्पॉट प्राईस 0.9% कमी होऊन 23.44 डॉलरवर ट्रेड करत आहेत. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,750 रुपये
पुणे – 52,750 रुपये
नागपूर – 52,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,550 रुपये
पुणे – 57,550 रुपये
नागपूर – 57,550 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता