हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात आज (23 सप्टेंबर रोजी) सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याने आज 50,000 रुपयांचा टप्पा ओलांडला तर चांदी देखील 58,000 रुपयांच्या वर आली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये वाढ झालेली पहायला मिळते आहे. MCX वर सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये आज सोन्याची किंमत 0.29 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत देखील कालच्या क्लोझिंग प्राईस पेक्षा 0.30 टक्क्यांनी वर आली आहे.
आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 29 रुपयांनी वाढून 50,029 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तसेच आज सकाळी MCX वर चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर 173 रुपयांनी वाढून 58,200 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये 0.30 टक्क्यांनी तर चांदीच्या किंमतीत 0.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति औंस $1,671.53 वर गेला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट प्राईस 19.64 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,730 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,500 रुपये
पुणे – 46,530 रुपये
नागपूर – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,730 रुपये
पुणे – 50,760 रुपये
नागपूर – 50,760 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4603.00 | Rs 4583.00 | -0.436 %⌄ |
8 GRAM | Rs 36824 | Rs 36664 | -0.436 %⌄ |
10 GRAM | Rs 46030 | Rs 45830 | -0.436 %⌄ |
100 GRAM | Rs 460300 | Rs 458300 | -0.436 %⌄ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5023.00 | Rs 4999.00 | -0.48 %⌄ |
8 GRAM | Rs 40184 | Rs 39992 | -0.48 %⌄ |
10 GRAM | Rs 50230 | Rs 49990 | -0.48 %⌄ |
100 GRAM | Rs 502300 | Rs 499900 | -0.48 %⌄ |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या