हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही धातूंच्या किंमतीने मोठी झेप घेतली आहे. सोने 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचले आहे तर चांदी देखील 71,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. Gold Price Today
आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 748 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 1,499 रुपयांनी वाढून 71,340 रुपये प्रति किलो झाला. Gold Price Today
जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस मागील बंदच्या तुलनेत 0.16 टक्क्यांनी वाढून $1,953.47 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 2.84 टक्क्यांनी वाढ होऊन ते 24.280 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,600 रुपये
पुणे – 53,600 रुपये
नागपूर – 53,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 58,470 रुपये
पुणे – 58,470 रुपये
नागपूर – 58,470 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता