हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये आज सोन्या-चांदीच्या किंमती ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत असल्याचे दिसून येत आहे. आज (2 जानेवारी रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.17 टक्के तर चांदीची किंमत 0.13 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, MCX वर सोन्याचा भाव सपाट पातळीवर बंद झाला होता तर चांदीचा दर देखील 0.97 टक्क्यांनी घसरला होता. Gold Price Today
हे लक्षात घ्या कि, आज, फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 09:15 पर्यंत 95 रुपयांनी वाढून 55,112 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,052 रुपये झाला. MCX वर आज चांदीमध्येही तेजी दिसून येत आहे. चांदीचा दर आज 87 रुपयांनी वाढून 69500 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा दर आज 69,503 रुपयांवर उघडला. Gold Price Today
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.19 टक्क्यांनी वाढून $1,827.41 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.02 टक्क्यांनी वाढून $23.96 प्रति औंस झाली. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,040 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,040 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 55,040 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता