हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सोन्याच्या किंमतींत चढ-उतार सुरु आहेत. तसेच चांदी देखील आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर ट्रेड करत आहे. 60,000 रुपयांच्या पुढे धावणाऱ्या सोन्याने आता पुन्हा वेग घेतला आहे. तसेच चांदीचा भावही 75 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. त्याच प्रमाणे येत्या काळात चांदी 80,000 रुपये प्रति किलो तर सोने 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आज (मंगळवारी) MCX वर सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. याआधी सोमवारी त्यामध्ये वाढ झाली होती. MCX वर मंगळवारी सकाळी 11 वाजता सोने 321 रुपयांनी वाढून 60384 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 571 रुपयांनी वाढून 74894 रुपयांवर ट्रेड करत होती. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 0.44 टक्क्यांनी वाढून 2,001.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तसेच चांदीची स्पॉट प्राईस 0.60% टक्क्यांच्या वाढीने $ 25.11 प्रति औंस ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 55,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 60,760 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 55,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 60,760 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 55,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 60,760 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,700 रुपये
पुणे – 55,700 रुपये
नागपूर – 55,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 60,760 रुपये
पुणे – 60,760 रुपये
नागपूर – 60,760 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर