हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतात आता सणासुदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये या हंगामात सोने-चांदीची भरपूर खरेदी केली जाते. ज्यामुळे, यादरम्यान सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज MCX वर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमती वाढताना दिसत आहेत. Gold Price Today
आज ( 7 ऑक्टोबर, 2022 ) सकाळी 10:10 वाजता MCX वर सोन्याची किंमत किरकोळ कमी होऊन 30 रुपये किंवा 0.06% कमी होऊन 51,942 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ट्रेड करत होती तर चांदी 185 रुपये किंवा 0.3% ने वाढून 61,531 प्रति किलो वर पोहोचली. मात्र याच्या काही काळानंतर, सोन्याचा भाव 52,000 च्या वर गेला आणि सरासरी किंमत 51,968 रुपये प्रति युनिट नोंदवली गेली, तर चांदीची सरासरी किंमत 61,579.50 रुपये प्रति युनिट इतकी नोंदवली गेली. Gold Price Today
आज, आंतरराष्ट्रीय बाजारात आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज सोन्याची फ्युचर्स प्राईस $ 0.10 किंवा 0.01% च्या किंचित वाढीने $ 1720.90 प्रति औंस वर ट्रेड करत आहे तर चांदीची फ्युचर्स प्राईस $ 0.116 किंवा 0.56% वर $ 0.66 च्या पातळीवर आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,580 रुपये
पुणे – 47,880 रुपये
नागपूर – 47,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,200 रुपये
पुणे – 52,230 रुपये
नागपूर – 52,230 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
07 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
06 Oct 2022 | ₹ 4,863 | ₹ 38,904 | ₹ 5,106 | ₹ 40,848 |
05 Oct 2022 | ₹ 4,883 | ₹ 39,064 | ₹ 5,127 | ₹ 41,016 |
04 Oct 2022 | ₹ 4,823 | ₹ 38,584 | ₹ 5,064 | ₹ 40,512 |
03 Oct 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
02 Oct 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
01 Oct 2022 | ₹ 4,733 | ₹ 37,864 | ₹ 4,970 | ₹ 39,760 |
30 Sep 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
29 Sep 2022 | ₹ 4,728 | ₹ 37,824 | ₹ 4,964 | ₹ 39,712 |
28 Sep 2022 | ₹ 4,648 | ₹ 37,184 | ₹ 4,880 | ₹ 39,040 |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या