हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजाराबरोबरच आज भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र वाढ होताना दिसत आहे. MCX वर आज (18 ऑक्टोबर रोजी) सोन्याची फ्युचर्सची किंमत 131 रुपयांनी (0.26 टक्के) घसरून 50,342 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्याचवेळी, चांदीचा भाव 125 रुपयांनी (0.22 टक्के) वाढून 56432 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
सोमवारी सोन्या-चांदीच्या फ्युचर्स किंमतींमध्ये वाढ झाली होती. MCX वर काल सोन्याचा भाव 256 रुपयांनी वाढून 50516 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. इथे हे लक्षात घ्या की या किंमती डिसेंबर महिन्यासाठीच्या आहेत. MCX वर आज सकाळी सोन्या-चांदीने घसरणीने सुरुवात केली, मात्र थोड्याच वेळात चांदीमध्ये वाढ झाली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 5 डॉलरच्या वाढीसह 1653 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीची स्पॉट प्राईस देखील $0.40 ने वाढून $18.70 प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,670 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,420 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,640 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,670 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,420 रुपये
पुणे – 46,450 रुपये
नागपूर – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,680 रुपये
पुणे – 50,670 रुपये
नागपूर – 50,670 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
17 Oct 2022 | ₹ 4,733 | ₹ 37,864 | ₹ 4,970 | ₹ 39,760 |
16 Oct 2022 | ₹ 4,733 | ₹ 37,864 | ₹ 4,970 | ₹ 39,760 |
15 Oct 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
14 Oct 2022 | ₹ 4,763 | ₹ 38,104 | ₹ 5,001 | ₹ 40,008 |
13 Oct 2022 | ₹ 4,763 | ₹ 38,104 | ₹ 5,001 | ₹ 40,008 |
12 Oct 2022 | ₹ 4,768 | ₹ 38,144 | ₹ 5,006 | ₹ 40,048 |
11 Oct 2022 | ₹ 4,778 | ₹ 38,224 | ₹ 5,017 | ₹ 40,136 |
10 Oct 2022 | ₹ 4,833 | ₹ 38,664 | ₹ 5,075 | ₹ 40,600 |
09 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
08 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज