हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. आज MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 139 रुपयांनी वाढून 59,595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 106 रुपयांनी वाढून 70, 478 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होता.
हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात प्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 59,734 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली तर मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत प्रतिकिलो 70, 584 रुपयांवर बंद झाली. Gold Price Today
त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस $ 4.06 ने घसरून $ 1,967.91 प्रति औंसवरतर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.11 च्या घसरणीने $ 23.23 प्रति औंसवर ट्रेड करत आहे.Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,690 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,690 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,690 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर