हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 11 नोव्हेंबर (Gold Price Today) रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून चांदी घसरली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचे भाव 15 रुपयांच्या किंचित वाढीसह 52,124 रुपये झाले आहेत. तर चांदीच्या दरात 46 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. चांदी प्रतिकिलो 61,865 रुपये आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,180 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,150 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,180 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत