Gold Price Today : सोने चांदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी! मौल्यवान धातूंच्या किंमतीत आज मोठी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today: महिलांसाठी सोन्याचे दागिने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. एखादा सण आला की महिलांची गर्दी जास्त प्रमाणात सराफ बाजारात दिसून येते. मात्र सध्या सोन्या – चांदीच्या किमती स्थिर नसल्यामुळे सोने नक्की कधी खरेदी करावे हा महत्त्वाचा प्रश्न महिला मंडळासमोर उभा राहिला आहे. कारण गेल्या आठवड्यापासून या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडले आहेत. परंतु आता या किमतींमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुरुवारनंतर आज (शुक्रवारी) देखील सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली होती ती आज देखील कायम आहे.

Gold Price Today
Gold Price Today

दररोज ऑनलाईन वेबसाईट्स सोन्या-चांदीच्या किंमतीची (Gold Price Today) माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला, MCX वेबसाईट आणि गुडरिटर्न्सवरील किंमती सांगणार आहोत. MCX वेबसाईट, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,300 रुपये असा सुरु आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,350 रूपयांनी व्यवहार करत आहे. तसेच गुडरिटर्न्स नुसार, शुक्रवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,700 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,510 रूपयांनी व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, (Gold Price Today) आज चांदीच्या किंमतीही स्थिर आहेत. मौल्यवान असणाऱ्या 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे गुरुवारनंतर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदी केल्यावर योग्य भावात परवडू शकते. तसेच, सोन्याची खरेदी केल्यास ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

 गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,700 रुपये
मुंबई – 54,700 रुपये
नागपूर – 54,700 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,510 रूपये
मुंबई – 59,510 रूपये
नागपूर – 59,510 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.