हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफ बाजारात सोने चांदीच्या भावात (Gold Price Today) रोज चढउतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव ५९ हजार ३३८ रुपये प्रती १० ग्रॅमवर येऊन ठेपला आहे. तर ७५ हजार रुपये किलोच्या जवळ चांदीचे दर पोहचले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या भावात हे चढउतार पाहिला मिळत आहेत. त्यामुळे सोने खरेदी कोणत्या मुहुर्तावर करावे हा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.
शुक्रवारी तर सोन्याचे टेंडीग भाव ५९ हजार ३५३ रुपयेवर येऊन पोहचले आहेत. परंतु आजच्या भावानुसार (Gold Price Today) या किंमतीत 14 रुपयांची घसरण झाली आहे. इतकेच नव्हे तर, देशातील सराफ बाजारात सर्वात जास्त उच्चांकात सोन्याचा भाव २ हजार ३०९ रुपये स्वस्त झाला आहे. यापूर्वी गेल्या ४ मे रोजी सोन्याचा दर ६१ हजार ६४६ रुपये प्रती १० ग्रॅम असा होता.
दुसऱ्या बाजूला चांदीच्या भावाविषयी बोलायचे झाले तर, आज चांदीचा भाव प्रति किलो १३८७ रुपये वाढीसह ७४ हजार ९७९ रुपये इतका झाला आहे. आयबीजेऐच्या माहितीनुसार, आज सोन्याच्या भावात १४ रुपयांची किंचित घसरण झाली असून सध्या देशातील बाजारात सोने २ हजार ३०९ रुपये स्वस्त आहे. तर चांदीचा भाव हा ७४ हजार ९७९ रुपये इतका झाला आहे.
गेल्या ४ मे रोजी सोन्याने ६१ हजार ६४६ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. आता यामध्ये फक्त काही प्रमाणातच घसरण झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी हीच घसरण मे आणि जून महिन्यात झाली होती. तेव्हा सोन्या चांदीचे दर कमी झाल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांनी गर्दी जमवली होती. मात्र पुन्हा या भावांनी उच्चांक गाठला आहे. आता इथून पुढे दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आयबीजेऐकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सोन्याची शुद्धता कशी तापासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. दरम्यान जर तुम्हाला आपल्या शहरातील २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर (Gold Price Today) जाणून घ्यायचे असतील तर आपण घर बसल्या ८९५५६६४४३३ वर मिस कॉल देऊ शकता