Gold Price Today | अधिकमासाच्या महिन्यात सोने खरेदी करण्याला जास्त महत्व दिले जाते. अधिकमास महिना कोणताही मौल्यवान धातू, वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ समजला जातो. यामुळे अनेकजण या महिन्यात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सोने चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांसमोर मोठी अडचण उभी राहीली आहे. सलग दोन आठवडे सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु, आता कुठे या किमती घटल्या आहेत. 15 ऑगस्टनंतर बुधवारी म्हणजेच आज सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत.
MCX वेबसाईट बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति (Gold Price Today) 10 ग्रॅमने 55,360 रुपये असा सुरू आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,390 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, बुधवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,450 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,400 रूपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच आज सोन्याचे भाव दणक्यात घसरल्याचे दिसत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,450 रुपये
मुंबई – 54,450 रुपये
नागपूर – 54,450 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,400 रूपये
मुंबई – 59,400 रूपये
नागपूर – 59,400 रुपये
याचबरोबर दुसऱ्या बाजूला मूल्यवान चांदीच्या किमतींमध्ये देखील किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे चांदीचे देखील भाव वाढले आहेत. बुधवारी सराफ बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र 15 ऑगस्ट रोजी चांदी 728 रुपयांनी व्यवहार करत होती. तसेच 100 ग्रॅम चांदीचा भाव मंगळवारी 7,280 रुपये असा व्यवहार करत होता.
दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती
सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर (Gold Price Today) बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.