हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाचे सिझन सुरु होण्याच्या (Gold Price Today) आधीच सोने – चांदीच्या दरात वाढ सुरु आहे. आज 16 जानेवारी 2023 रोजी भारतीय वायदे बाजारात पुन्हा एकदा सोने- चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 187 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याचा भाव 56,511 झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर चांदी 493 रुपयांनी महाग झाली असून १ किलो चांदीचा भाव 69,920 रुपये आहे.
जागतिक बाजारपेठेत (Gold Price Today) सुद्धा सोने- चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.27 टक्क्यांनी वाढून $1,925.65 प्रति औंस झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 0.79 टक्क्यांनी वाढून 24.46 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. गेल्या 30 दिवसांत सोन्याच्या किमतीत 7.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,950 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,950 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,950 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत