जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून मुलीला प्राणघातक हल्ल्याची धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जामिनावर सुटका झाल्यांनतर पुन्हा एकदा 15 वर्षीय तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी एका 20 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मंगेश सोनवणे असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अहमदनगर परिसरात मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी याच आरोपीला अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनवणे याने तिच्या कॉलेजजवळ तिचा पाठलाग सुरू केला आणि तिला त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितला. 11 जानेवारी रोजी, जेव्हा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता त्याने तिचे केस ओढून तिच्यावर ब्लेडने वार केले . तसेच इथून पुढे भेटण्यास नकार दिल्यास तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची धमकी दिली, असे मुलीने सांगितलं आहे.

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने तिला जबरदस्तीने कॉलेजजवळच्या एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्या संपर्कात राहण्यास सांगितले. परंतु जेव्हा मुलीने त्याला सांगितलं की तिला त्याच्याशी बोलायचे नाही, तेव्हा त्याने ब्लेड काढले आणि बलात्कार करून फाडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तेथून निघताना, त्याने मी उद्या परत येईन असं सांगितले.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जानेवारी रोजी सदर पीडित मुलगी तिच्या आईवडिलांसोबत कॉलेजमध्ये गेली. तेव्हा आरोपीने तिला लांबूनच पाहून तेथून काढता पाय घेतला. त्यांनतर मुलीने संपूर्ण प्रकरण आपल्या आईवडिलांना संगितलं आणि हिल लाइन पोलिस ठाण्यात जाऊन त्याच्याविरुद्ध नवीन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354 (विनयभंग) , 354D (पाठलाग करणे) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कलम 8 आणि 12 अंतर्गत नवीन एफआयआर दाखल केला. 14 जानेवारीला सदर आरोपी मंगेश सोनवणेला अटक करत कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने त्याला 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.