Gold Price Today: बाजारात सोने-चांदीचे भाव पुन्हा लखलखले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : सध्या अधिक मास महिना सुरू असल्यामुळे सोने चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परंतु काल या सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 60,160 रुपये असा सुरू आहे. म्हणजेच मागील भावानुसार, आज सोन्याच्या 22 कॅरेटच्या भावात 150 रुपयांनी वाढ झाली असून 24 कॅरेटच्या भावात 160 रुपयांनी वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, या महिन्यात सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. तर मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात फारसे काही बदल झालेले पाहायला मिळाले नाहीत. (Gold Price Today)

सोन्याच्या किमतींबरोबर चांदीच्या भावात देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गुडरिटर्ननुसार, बुधवारी चांदीच्या 10 ग्रॅम भावासाठी 774 रुपये मोजावे लागले आहेत. याचबरोबर, 1 किलो चांदीसाठी 77,400 रुपये मोजावे लागणार आहेत. काल बाजारात चांदीच्या भावात घसरण झाली असता चांदी 10 ग्रॅमने 770 रूपयांनी सुरु होती. आजच्या भावानुसार चांदी चार रुपयांनी महागली आहे.

Gold Price Today

 गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासावी? (Gold Price Today)

(Gold Price Today) सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.