Gold Price Today |आज (मंगळवारी) सराफ बाजारात सोने – चांदी खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण की, आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चढउतार होत असलेल्या सोन्याच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे स्थानिक पातळीवर देखील सोन्याच्या किमतींनी गगन झेप घेतली आहे. ऐन सणासुदीला सोने चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
MCX वेबसाईटच्या माहितीनुसार देखील सोन्याच्या किंमती (Gold Price Today )वाढल्या आहेत. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव थेट 55,460 रुपयांवर पोहचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,500 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. मंगळवारी, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,700 रुपये सुरू आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,670 रूपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच या किंमती वाढल्याचे स्पष्ट होते.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,700 रुपये
मुंबई – 54,700 रुपये
नागपूर – 54,700 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,670 रूपये
मुंबई – 59,670 रूपये
नागपूर – 59,670 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्यासोबत चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे. मौल्यवान चांदीत होणारे बदल ग्राहकांना चांदी कधी खरेदी करावी हा प्रश्न पाडत आहेत. मंगळवारी, 10 ग्रॅम चांदी 771 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव, 7,710 रुपये असा सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदी 76,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र गेल्या आठवडयात याच चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. ज्या आता पुन्हा वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, रक्षाबंधन सणानिमित्त सराफ बाजारात सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र अशा काळातच या मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगली खात्री बसत आहे. अशातच, पुढील काही दिवस सोन्या चांदीचे भाव असेच स्थिर राहतील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.