Gold Price Today | जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये होणारे बदल स्थानिक पातळीवर देखील परिणाम करताना दिसत आहेत. जून महिन्यापासून बाजारातील सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र जुलै महिन्यापासून या भावात घसरण होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोने चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मंगळवार नंतर आज देखील सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदीसाठी अगदी योग्य मानला जात आहे.
MCX वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 55,780 असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,820 रूपयांनी व्यवहार करत आहे. तसेच गुडरिटर्न्सनुसार, बुधवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,950 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,950 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोने 100 ग्रॅमने 5,49,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातून आजचे सोन्याचे भाव घसरलेले दिसत आहेत.
जागतिक पातळीवर चांदीचे आजचे भाव देखील नरमलेले आहेत. मंगळवारी सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 740 रुपये असा सुरू होता. मात्र आज 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 735 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे मंगळवारच्या दरानुसार, आज चांदीच्या भावात 50 रुपयांचा फरक पडला आहे. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे सोने चांदीच्या किमतीत दररोज बदल होताना दिसत आहेत. मात्र आज मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 54,950 रुपये
नागपूर – 54,950 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये
दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर (Gold Price Today) बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.