नवी दिल्ली । लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याची ही वेळ चांगली आहे. कारण यावेळी सोन्या-चांदीच्या दोन्ही किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. आपण सोने किंवा चांदी देखील खरेदी करणार असाल तर नवीन दर येथे तपासून आजच खरेदी करा. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये आहे, तर 24 कॅरेटची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपये आहे.
सोने आणि चांदीची किंमत सर्व शहरांमध्ये बदलते. जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज त्या किंमतीत 100 रुपयांची घट नोंदली गेली आहे. 1 किलो चांदीची किंमत प्रति किलो 71,100 रुपये आहे. चला तर मग आज आपल्या शहरात सोन्याचांदीचे दर काय आहेत ते जाणून घेउयात.
22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today, 22 May 2021)
दिल्लीमध्ये ते प्रति 10 ग्रॅम 46,930 रुपये आहे.
मुंबईत ते प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये आहे.
चेन्नईमध्ये ते प्रति 10 ग्रॅम 45,900 रुपये आहे.
कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 46,850 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
दिल्लीमध्ये दर प्रति 10 ग्रॅम 50,830.
मुंबईत प्रति 10 ग्रॅम 47,000
चेन्नईमध्ये प्रति 10 ग्रॅम 50,050 रुपये
कोलकातामध्ये हा दर प्रति 10 ग्रॅम 50,470 रुपये आहे.
चांदी किंमत (Silver Price Today, 22 May 2021)
दिल्लीत प्रति 1 किलो 71,100
मुंबईत प्रति 1 किलो 71,110.
चेन्नईमध्ये दर 1 किलो 75,700.
कोलकातामध्ये हा दर प्रति 1 किलो 71,110 रुपये आहे.
अशा प्रकारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ”BIS Care app’ सह ग्राहक सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासू शकतो. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंबंधात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅप (App) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा