हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालेली आहे.मंगळवारी सोने स्वस्त झाले.आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या किंमती या झपाट्याने खाली आल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव हा ३३५ रुपयांनी खाली आला आणि बर्याच दिवसानंतर सोन्याची किंमत हि १० ग्रॅम साठी ४५,५०० रुपयांवर आली. मंगळवारी सोन्याची किंमत घटून प्रति १० ग्रॅम ४५,४७२ रुपये झाली.
सोने झाले स्वस्त
मंगळवारी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झाली.एमसीएक्सवरील सोन्याचे दर हे प्रति १० ग्रॅम ४५,५२७ रुपयांवर राहिले, तर चांदी ही १३२ रुपयांनी घसरून ४१,११२ रुपये प्रति किलो झाली.आता देशातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीचे सरासरी दर घेणाऱ्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर ५ मे २०२० रोजीच्या सोन्या-चांदीच्या किंमतीवर नजर टाकली तर ९९.९ टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत ही १७० रुपयांनी कमी करण्यात आली.प्रति १० ग्रॅम ते ४५७४३ रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी,९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती या १० ग्रॅम प्रति घसरून ४५५६० रुपयांवर आल्या.याशिवाय ते प्रति किलो ४०७१० रुपये होते.
सोने दहा ग्रॅम ८०००० रुपयांवर जाईल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार सोन्याच्या किंमती यंदा प्रचंड वाढतील.२०२१ पर्यंत सोन्याचे दर हे १० ग्रॅम साठी ८०,००० रुपयांच्या जवळपास असतील. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज तज्ज्ञांच्या मते, सन २०२१ च्या अखेरीस जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे औंस ३००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल. जर आपण ही किंमत १० ग्रॅम सोन्यासाठी पाहिली तर याची किंमत ८०,७५३ रुपये इतकी असू शकेल.
सोने ही सुरक्षित गुंतवणूक
सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव येत असतानाच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.या जागतिक पेचप्रसंगी गुंतवणूकदार आपले सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून निवडत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ होणार आहे.लॉकडाऊनमुळे सध्या सराफा बाजार बंद आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.