Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने आणि चांदीच्या नाण्यांवरील आयात शुल्क 15 टक्के करण्यात आले (Gold Rate Import Duty Hike) आहे. सोने आणि चांदीचे स्क्रू, हुक आणि नाणी यांच्यावरील आयात शुल्क पूर्वी 12.5 टक्के होते, ते आता 15 टक्के करण्यात आले आहे.

22 जानेवारी 2024 पासून देशभरात नवीन लागू Gold Rate

नवीन आयात शुल्क दर 22 जानेवारी 2024 पासून देशभरात लागू झाले आहेत. केंद्राच्या या नव्या नियमाचा उद्देश आयात नियंत्रित करणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. केंद्र सरकारने आकारलेल्या १५% आयात शुल्कात १०% मूलभूत कस्टम ड्युटी आणि ५% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकराचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशात सोने आणि चांदीचे दर (Gold Rate) वाढणार आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराईटीचे दिवस असतानाच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

दरम्यान, आंतरराष्‍ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर भारतातील सोन्याची किंमत (Gold Rate) ठरत असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे आपला भारत देश मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, हिऱ्याच्या कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आता आयात शुल्क १५% झाल्यानंतर स्थानिक बाजारातील सोन्या चांदीच्या किमतीवर मोठा परिणाम होणार आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील बार आणि नाण्यांची गुंतवणूक 55 टनांवर पोहोचली आहे, जी 2015 नंतर तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक नोंदवली गेली आहे