सोन्या चांदीचे दर का कमी होत आहेत? आजच्या नवीन किंमती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत घसरणीची नोंद झाली आहे. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घट झाले.तर चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत (Silver Price Today) 532 रुपयांनी खाली आली आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाले होते. मंगळवारी चांदीची किंमत 63,171 रुपये होती.

सोन्याच्या नवीन किंमती
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या नवीन सोन्याची किंमत आता प्रति 10 ग्रॅम 50,253 रुपये आहे. पहिल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर पती 10 ग्रॅम 50,610 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,882 डॉलर झाली आहे.

चांदीच्या नवीन किंमती
चांदीची चर्चा केली तर आज त्यातही घट नोंदली गेली. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 532 रुपयांनी घसरली. त्याची किंमत 62,639 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी बुधवारी प्रति औंस 24.57 डॉलरवर बंद झाली.

सोन्यात घट का झाली ?
एचडीएफसी सिक्‍योरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी मजबूत झाल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील झाला आहे. याशिवाय कोविड -१९ लस संदर्भातील सकारात्मक घोषणांचादेखील सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment