सेवा संपण्याच्या 15 दिवस आधी नागालँडमधील चकमकीत प्रमोद कापगते शहीद

0
134
Pramod Kapgate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी सकाळी नागालँड बार्डरवर झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते यांना गोळी लागून ते शहिद झाले आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी या गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे कुटुंब सद्या परसोडी येथेच वास्तव्यास आहेत. प्रमोद कापगते हे भाजपचे जेष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपत्र आहेत. प्रमोद कापगते हे बीए अंतीम वर्षाला असताना सन २००१ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात झाले. ते गेल्या २० वर्षापासून ते सीआरपीएफमध्ये आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

प्रमोद यांचा १५ दिवसांनी सीआरपीएफमधील २० वर्षांचा बॉंड पूर्ण होणार होता. पण मंगळवारी नागालॅंड बार्डवर झालेल्या चकमकीत त्यांना गोळी लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. प्रमोद कापगते यांच्या मागे पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाला कापगते, भाऊ राजेश कापगते व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहीद प्रमोद कापगते यांचे पार्थिव २७ मे रोजी सकाळी सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी गावी आणण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here