औरंगाबाद – औरंगाबादहून पुन्हा एकदा दीड तासात बंगळुरू गाठता येणार आहे. इंडिगोची सकाळच्या वेळेत ही विमानसेवा 15 एप्रिल पासून पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली असल्याची माहिती विमानतळाचे संचालक डि.जी. साळवे यांनी दिली.
कोरोना पूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगो कडून बंगळुरू साठी विमान सेवा दिली जात होती. परंतु कोरूना मुळे ही कनेक्टिव्हिटी तुटली. आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे नोकरी शिक्षणासाठी औरंगाबाद हुन बंगळुरूला जाण्याची संख्या मोठी आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही.
स्पाइस जेट, जेट एअरवेज कडून पुन्हा एकदा विमान सुरू केली जाईल असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात येत होते. परंतु, या दोन्ही कंपन्यांच्या विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.