व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांकडून सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा थेट आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली. त्यानंतर त्याच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधण्यात आला. यामध्ये किरीट सोमय्यांनीही टीका केली. दरम्यान आज संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. “INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये गोळा केले आहेत. तसेच तो गोळा केलेली रक्कम अजून जास्त आहे. सोमय्या म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे,” असा आरोप राऊत यांनी आज केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. जर किरीट सोमय्यांना केंद्रीय सुरक्षाव्यवस्था दिली असेल तर केंद्र सरकराने या देशाच्या सुरक्षेसाठी खेळणाऱ्या देशद्रोही व्यक्तीला सुरक्षा देत देशाशी धोका केला आहे.

किरीट सोमय्या हा देशद्रोही आहे. त्याने 57 कोटी जमा केले. हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणी यावेळी राऊत यांनी केली.