हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एक देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा सारख्या वस्तूंची गरज असते. हे जर असेल तर तुम्हाला इतर देशात जाता येते. मात्र अनेक देश असे आहेत जिथे पासपोर्टवर तुम्हाला फिरता येऊ शकते. भारतीय पासपोर्टची किंमत एवढी वाढतीये की आता विना व्हिसा भारतीय काही देशात फिरू शकतात. त्यात आता आणखी एका देशाची भर पडली असून हा देश म्हणजे इराण आहे.
इराण या देशात भारतीयांना आता विना व्हिसा जाता येणार आहे. इराण च्या सरकारने ही भारतासाठी भेट दिली आहे. भारतीय नागरिक इराण मध्ये यावेत आणि तेथील पर्यटनास चालना मिळावी म्ह्णून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे अनेक भारतीय फिरण्यासाठी म्हणून इराणला जातील आणि येथील पर्यटनास चालना मिळेल असा उद्देश इराण सरकारचा आहे.
33 देश्यांना केली व्हिसाची अट रद्द
इराणच्या सरकारने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतासह इतर ३३ देशांना व्हिसाची अट रद्द केली आहे. अनेकदा इतर देशात जाण्यासाठी व्हिसा मान्य होत नाही. त्यासाठी अनेक दिवस,महिने वाट पाहवी लागते. मात्र आता इराणमध्ये जाण्यासाठी असे होणार नाही. तुम्हाला लगेच पासपोर्टच्या साहाय्याने इराणला जाता येईल.
कोणते आहेत व्हिसा रद्द केलेले देश?
भारतासह एकूण ३३ देशांना व्हिसा रद्द केल्यामुळे येथील सांस्कृतिक वारसा भारतीयांसह इतर देशांनाही अनुभवता येणार आहे. यामध्ये ट्युनिशिया, लेबनॉन, सौदी अरेबिया, अनेक मध्य आशियाई, आफ्रिकन आणि मुस्लिम देशांसह एकूण 33 देशांना इराणमधील प्रवास हा व्हिसामुक्त केला आहे. एवढेच नाही तर, नाटो आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या पाश्चात्य मित्र युरोपीय राष्ट्र क्रोएशियाच्या लोकांनाही ही भेट मिळाली आहे. त्यामुळे इराणच्या पर्यटनास चालना मिळणार हे नक्की.