SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वरील व्याजदरात केली 20-40 बेस पॉईंट्सने वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD ची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा एक चांगला पर्याय मानला जातो, जो गॅरेंटेड रिटर्न देतो. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो

जर तुमचे खाते देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट असलेल्या FD वरील व्याजदरात 20-40 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे. बँकेचे नवीन दर गुरुवारपासून (10 मार्च 2022) लागू झाले आहेत.

SBI च्या म्हणण्यानुसार, 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या FD वरील व्याजदरात 20 बेस पॉंईटसनी वाढ करण्यात आली आहे. बदलानंतर 10 मार्च 2022 पासून अशा FD वर 3.30 टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा दर 3.10 टक्के होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर पूर्वी 3.60 टक्के व्याज मिळत होते, ते आता 3.80 टक्के करण्यात आले आहे.

FD व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी
SBI ने आणखी काही फिक्स्ड डिपॉझिटचे दरही वाढवले ​​आहेत. SBI च्या वेबसाइटनुसार, 2 वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD मुदतीसाठी 10 बेस पॉईंट्सने 5.20 टक्के, तीन वर्षापासून ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD मुदतीसाठी 15 बेस पॉईंट्सने 5.45 टक्के व्याजदर वाढवला आहे. तर 5-10 वर्षांपर्यंतच्या FD साठी, या वर्षी 15 फेब्रुवारीपासून व्याज दर 10 बेस पॉइंट्सने 5.50% पर्यंत वाढवला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य दरापेक्षा 0.50% जास्त दर
ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीसाठी सामान्य दरापेक्षा 0.50% जास्त मिळेल. बदलानंतर, ज्येष्ठ नागरिकांना आता सात दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD वर 3.5 ते 4.10 व्याजदर मिळेल.

Leave a Comment