नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँकअसलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस (IMPS) ट्रान्सझॅक्शनवर कोणताही सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. SBI ने मंगळवारी सांगितले की, ही तरतूद YONO अॅप युझर्ससाठी देखील लागू आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन IMPS करून घेतल्यास, तुम्हाला जीएसटीसह सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. SBI ने सांगितले की, या सूचना 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत IMPS ट्रान्सझॅक्शनची कमाल मर्यादा 2 लाख रुपये होती, जी आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत एसबीआय केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्सझॅक्शनवर सर्व्हिस चार्ज आकारत नाही.
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन
SBI ने सांगितले की,” ग्राहकांमध्ये डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (YONO App सह) द्वारे IMPS ट्रान्सझॅक्शनवर सर्व्हिस चार्ज लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक शाखांमधून IMPS ट्रान्सझॅक्शनसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सर्व्हिस चार्ज 20 रुपये असेल आणि त्यासोबत जीएसटीही घेतला जाईल.”
सध्या बँकेच्या शाखांमध्ये केवळ 1,000 रुपयांपर्यंतचे IMPS ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस चार्जशिवाय आहेत. रु. 1,001 रु. 10,000 पर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनवर रु. 2 + GST लागू होतो. दुसरीकडे, 10,001 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनवर 4 रुपये + GST लागू आहे. 1 लाख ते 2 लाख रुपये सर्व्हिस चार्ज 12 रुपये + GST आहे.