हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp लवकरच आपल्या युजर्सना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये, पेमेंट सेवा वाढवण्यासाठी WhatsApp कॅशबॅक रिवॉर्ड्स लाँच करत आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची चाचणी करत होती. या चाचणीनंतर अशी बातमी समोर आली आहे, की Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या पेमेंट App शी स्पर्धा करण्यासाठी लवकरच WhatsApp पेमेंटवर कॅशबॅक योजना सुरू करणार आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबतीत माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार भारतातील 100 दशलक्ष Wapp युजर्सना पेमेंट सेवा देण्यासाठी WhatsApp ला मंजुरी मिळाल्यानंतर ही कॅशबॅक योजना भारतातील युजर्ससाठी सुरु होणार आहे.
WhatsApp मे अखेरपर्यंत कॅशबॅक ऑफर लाँच करू शकते. यामध्ये यूजर्सना WhatsApp पेमेंट सेवेद्वारे फंड ट्रान्सफर केल्यास 33 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. म्हणजेच, यासाठी तुम्हाला WhatsApp UPI सेवेचा वापर करून पैसे टान्सफर करायचे आहेत.
चला तर मग पाहुयात WhatsApp वरून पैसे ट्रान्सफर करून तुम्ही पैसे कसे मिळवाल…
WhatsApp वर कसे मिळणार पैसे:
१. फंड ट्रान्सफर करण्यासाठी WhatsApp पेमेंट मोडचा वापर करा.
२. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना पैसे पाठवा.
३. ३ वेळा पैसे ट्रान्सफर केल्यावर तिन्हीवेळा वेगवेगळी कॅशबॅक मिळणार.
४. प्रत्येक ट्रान्सफरवर मिळणार 33 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक
५. ट्रान्सफर केलेल्या रकमेत फरक पडणार नाही.
६. युजर्सनी 1 रुपया ट्रान्सफर केला तरी कॅशबॅक ऑफर मिळणार.