सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बाॅलवर षटकार मारला आहे. दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. मक्याच्या शेतात अवैध अशा गांजाची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईमुळे माण तालुक्यातील , इतर अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, माण मधील मार्डी येथे पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मके सारख्या पिकांत गांजा लागवड करून त्याची विक्री करत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी वेशांतर करून गुडघाभर चिखलात घुसून सदर शेतात छापा टाकला. सदर छाप्यात दहिवडी पोलीस ठाण्याची इतिहासातील आजपर्यंतच्या गांजा विक्री विरोधातील सर्वात मोठी कारवाई करत राहुल तुकाराम गायकवाड वय 23 यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत सपोनि अक्षय सोनवणे यांनी सुमारे नऊ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर घटनेची सविस्तर कारवाई उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनी अक्षय सोनवणे संजय केंगले, प्रकाश हांगे, नीलम रासकर आदि पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सरकारी पंच म्हणून नायब तसिलदार इतर, मंडल अधिकारी खेडेकर, तलाठी योगेश अभंग, इ. काम पाहिले.
दहिवडी पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी गांजा कारवाई,पोलिसां केल्याने दहिवडी पोलिस नियंत्रणेच्या सर्वत्र माण तालुक्यात चर्चा होता आहे. सदर कारवाईमुळे माण तालुक्यातील , इतर अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार आहे. तरुण पिढी व्यसनाधीनतेपासून परावृत्त होण्यासाठी दहिवडी पोलिसांनी केलेल्या कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत आहे.