नवी दिल्ली । सध्याच्या डिजिटल युगात, Google आता फक्त एक सर्च इंजिन किंवा नुसताच हेल्पिंग टूल बनून राहिलेले नाही तर खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहे. Google ही प्रत्येकाची गरज बनली आहे. जो इंटरनेट वापरतो त्याच्या जवळ Google Account आहे. Google Account हे केवळ Account नाही तर ते आपल्या सर्वांच्या व्हर्चुअल माहितीची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे.
Google Account वरील वन क्लिक लॉगिन सिस्टीम लवकरच संपेल. तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचे Account अपडेट करावे लागेल. आपण आपले Google Account पासवर्डने सिक्योर ठेवतच असतो मात्र Google ही वेळोवेळी स्वतःला अपडेट करत राहते.
Google पुन्हा एकदा स्वतःला अपडेट करणार आहे. Google 9 नोव्हेंबरला स्वतःला अपडेट करणार आहे. आता तुम्हाला एक मोठे सिक्युरिटी अपडेट मिळेल. Google Account चे टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑटोमॅटिकपणे Active केले जाईल. तुम्हाला या अपडेटबद्दल माहिती मिळेल. तुमचे Google Account अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमचे Account अपडेट करावे लागेल.
तुमचे Google खाते कसे सिक्योर करावे
तुमचे Google खाते सिक्योर ठेवण्यासाठी, तुम्ही Google च्या टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा खूप फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्ही सिक्योरिटी चेकअप टूलद्वारे तुमचे Account तपासत राहिले पाहिजे. एकदा तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर, तुम्ही नवीन डिव्हाइसवर साइन इन करता तेव्हा तुम्हाला एक अलर्ट मिळेल. जर तुमच्या खात्याशी इतर कोणी छेडछाड केली तर तुम्हाला लगेचच त्याची माहिती मिळेल.
Google ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की,” 2021 च्या अखेरीस, कंपनी 15 कोटी Google युझर्ससाठी 2-Step Verification ऑटो-इनरोल करेल. यासह, 20 लाखांहून अधिक Youtube क्रिएटर्ससाठी 2-Step Verification लागू केले जाईल. याशिवाय, जर तुम्हाला कधीही सार्वजनिक नेटवर्क वापरायचे असेल तर, Google तुम्हाला Address Bar मध्ये वॉर्निंग देऊन सांगेल की हे डिव्हाइस तुमच्यासाठी सुरक्षित आहे की नाही.
Google ने नवीन फीचर आणले आहे
Google ने अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन टूल लाँच केले आहे, ज्यामध्ये कंपनी आई-वडील/गार्डियन आणि कायदेशीर प्रतिनिधींच्या विनंतीनुसार त्यांच्या सर्च रिझल्ट्समधून अल्पवयीन मुलांचे इमेजेस काढून टाकते. Google ने म्हटले आहे की, ते 18 वर्षाखालील कोणत्याही किशोरवयीन मुलाचे इमेजेस सर्च रिझल्ट्समधून काढून टाकेल. यासाठी, किशोर, त्यांचे आई-वडील/गार्डियन यांना Google कडे Request करावी लागेल.