हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या वर्जन अमेरिकेच्या फोनमध्ये चालणार नाही.
मुख्य म्हणजे, Google Pay ने पीअर-टू-पीअर पेमेंटची सेवा देखील बंद करून टाकली आहे. याच्या मदतीने तुम्हाला अमेरिकेतील व्यक्तीला पैसे पाठवणे शक्य होते. यात 4 जून 2024 पासून गुगल पे ॲपचे अमेरिकन व्हर्जन देखील ग्राहकांसाठी उपलब्ध नसणार. मात्र या सगळ्यात भारत आणि सिंगापूर सारख्या ठिकाणी याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारतामध्ये गुगल पे सुरळीत रित्या चालू राहील.
स्वतः गुगलने म्हटले आहे की, भारत आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये गुगल पे ॲप मध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र अमेरिकेत गुगल पे बंद झाल्यानंतर युजर्सला पैशांचे कोणतेही लेण-देणं करता येणार नाही. महत्वाचे म्हणजे कंपनीने सल्ला दिला आहे की, युजरने Google Pay बंद होण्यापूर्वी Google Wallet ॲपवर शिफ्ट व्हावे. यामध्ये युजर त्यांच्या खात्यावर असलेले पैसे पाहू शकतील अरे हेच पैसे बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्याचे सुविधा गुगल पे वर देण्यात येईल.
दरम्यान, तुम्हाला जर गुगल पेमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही वेबसाइटच्या मदतीने शिल्लक रक्कम ट्रान्सफर करू शकता. ही प्रक्रिया तुम्ही गुगल पे सुरू आहे तोपर्यंतच करू शकता. कारण, जून महिन्यानंतर गुगल पे हे जुने वर्जन बंद पडल्यास तुम्हाला कोणतेही क्रिया करता येणार नाही. लक्षात घ्या की, गुगल पे बंद पडल्यानंतर त्याचा कोणताही परिणाम भारतातील युजर्स वर होणार नाही.