हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google : देशातील स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असणाऱ्या महिलांची ही गरज गूगलकडून पूर्ण केली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, Google कडून 75,000 कोटी रुपयांच्या ‘इंडिया डिजिटायझेशन फंड’ द्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. सोमवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
इंटरनेटच्या जगात सहज प्रवेश मिळवून देण्यासाठी, कंपनीने $10 अब्ज (सुमारे 75,000 कोटी रुपये) चा ‘इंडिया डिजिटायझेशन फंड (IDA)’ सुरू केला आहे. या IDF द्वारे, Google ने Jio मधील 7.73 टक्के स्टेक $4.5 अब्ज आणि भारती Airtel मधील 1.2 टक्के स्टेक $700 मिलियन मध्ये खरेदी केले आहेत.
‘महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सवर खास लक्ष देणार’
गूगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष असलेल्या संजय गुप्ता ने ‘गूगल फॉर इंडिया’ कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले कि,”आमच्या IDF च्या गुंतवणुकीचा एक भाग म्हणून पुढे जाऊन, आम्ही महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपवर विशेष लक्ष केंद्रित करून स्टार्टअप कंपन्यांना मदत करू.” हे लक्षात घ्या कि, कंपनीने स्पीच टेक्नॉलॉजी, व्हॉईस आणि व्हिडीओ सर्च यासारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अनेक प्रकल्प जाहीर केले आहेत.
गुप्ता पुढे म्हणाले कि, “आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपल्याला लिखित सामग्रीचे त्वरित व्हिडिओमध्ये रूपांतर करता येईल. तसेच याद्वारे इंग्रजीतून कोणत्याही भाषेमध्ये भाषांतर करणे देखील सहजपणे शक्य होईल.”
कंपनीने भारतातील 773 जिल्ह्यांमधून भाषण डेटा गोळा करण्यासाठी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. या डेटाच्या मदतीने कंपनी आपले भाषांतर आणि सर्च तंत्रज्ञान सुधारेल. Google ने IIT मद्रास येथे भारतातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यासाठी US$ 1 मिलियन अनुदान देण्याची घोषणा केली.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://blog.google/inside-google/company-announcements/investing-in-indias-digital-future/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा