हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी परिवहन खात्यावर टीका केली आहे. परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला
एकतर तुटपुंजा पगार, त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटीचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात.पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय? परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला
मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे