हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदापवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांची जीभ घसरली. “संभाजी महाराज धर्मवीर नसते जे कोणी असे म्हणत आहेत असे म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता’ झाली असती. त्यांना जर तसे वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावे,” असे पडळकर यांनी म्हंटले.
पुणे येथे एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका ते म्हणाले की, संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला पवारांनी सांगावे. दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर वाद पेटण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले होते पवार?
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावेळी प्रचंड गदारोळ माजला होता. अजित पवार म्हणाले होते, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते.