हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अश्या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केल्याचं समजतं.
बहुजनांच्या बाजूने उभं राहिल्यामुळे यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी,” अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.